गजानना श्री गजानना Gajananna Shree Gajananaa
विनायका , गणराया , गजानना …
गजानना श्री गजानना , गजानना
करू तुझी प्रार्थना, आम्हा पाव ना , रे शिवनंदना
तू आदी अन तूची अनंता
तू विधाता एकदंता
हे दयाळू , हे कृपाळू , तुला कोटी वंदना ॥
दे आम्हा तू ऐसी दृष्टी
तुजसम लागे सारी सृष्टी
दीन दु:खी सेवा रूपी, घडो तुझी साधना |
नको सुखाचा भोग आम्हाला
जडो भक्तिचा रोग आम्हाला
लोभ मोह निर्बंध तोडूनी, येऊ तुझ्या दर्शना |